तर्हाडी। शिरपुर तालुक्यातील विखरण प्राथमिक के्ंरदातर्गत ‘डॉक्टर तुमच्या दारी’ उपक्रमसतंर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचा वरूळ, भटाणे, जवखेडा, लोंढरे येथील 153 रूग्णांनी लाभ घेतला. दरम्यान, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन यांनी शिबीरास अचानक भेट दिली.रूग्णांशी चर्चा करून त्यांची गोळ्या, औषधांची पाहणी केली. सर्वसाधारण वर्गांतील मजुरी करणारे रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचत नाही यासाठी बाजारपेठेचे गाव वरूळमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
शिबीरात डॉ. प्रसन्ना कुलकर्णी यांनी रूग्णांची तपासणी केली. आरोग्य सहाय्यक प्रकाश वाघ, एस. एस. वाघ, आरोग्यसेविका के. एस. बोरसे यांनी सहकार्य केले. श्री. गंगाथरण यांनी शिबीराच्या पाहणीनंतर वरूळ जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी, पोषण आहाराची तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. तसेच पोषण आहाराची चवही घेऊन पाहिली. चौकशी करीत असतांना कर्मचार्यांव्यतिरिक्त कोणत्याही पदाधिकार्यांनी थांबू नये अशी सूचना त्यांनी दिली होती. केंद्र प्रमुख एम.एस. सुर्यवंशी, मुख्याध्यापिका प्रतिभा देवरे, शिक्षीका वैशाली पाटील, शिक्षक प्रविण पाटील यांच्याशी गुणवत्तेविषयी चर्चा केली.