मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा अलिकडेच ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ठरला. आता पुन्हा शाहरुखने त्याच्या ‘डॉन’ चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, या वेळी प्रियांका चोप्रा या चित्रपटात दिसणार नाही. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न झाल्यानंतर प्रियांका अमेरिकेला रवाना झाली आहे. तिथे ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला डॉनच्या तिसऱ्या भागासाठी काम करणं शक्य नसल्याचं कारण तिने दिले आहे.