कोल्हापूर । पालकंमत्री,जिल्हाधिकारी यांनी डॉल्बी लावणार्या कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहे.तर यात भर म्हणून जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागु केली आहे.त्यामुळे डॉल्बी लावणार्या विरूध्द कारवाई होणार असे असतांना शिवसेनेचे आम राजेश क्षीरसागर यांनी डॉब्ली धारकांच्या समर्थनात उतरून त्यांना न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून परवानगी द्यावी यासाठी शिवाजी चौकात उपोषण केले.शिवाजी चौकाच्या मध्यवर्ती ठिकाणी मांडव घालून मी लढतोय, तुम्ही सहभागी व्हा. सर्वोच्च न्यायलयाच्या अधीन राहून साउंड सिस्टीमला परवानगी द्या, अशा आशयाचे फलक लावून शेकडो कार्यकत्रे उपोषणाला बसले होते. सर्वच कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. अवघा शिवाजी चौक उपोषणकर्त्यांनी व्यापल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.
भाजपा-सेनेत वाद
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणार्या संचारबंदी जिल्हाधिकार्यांनी आदेश दिले आहे.यावरून डॉल्बी लावण्यावरून भाजप – शिवसेनेतील वाद आणखीच उफाळला असून आरोप-प्रत्यारोप वाढत चालले आहेत. याचा प्रत्यय देताना शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी डॉल्बी लावला जाऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तरुण मंडळांना आणि तालीम मंडळांना पैसे वाटून गप्प बसविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून डॉल्बीला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी क्षीरसागर यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी चौकात आज उपोषण केले असता ते बोलत होते. सकाळी 11 वाजल्यापासून डॉल्बी लावण्याची परवानगी मिळावी यासाठी क्षीरसागर व कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात उपोषण केले.
याची होती उपस्थिती
उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष, महापौरपुत्र आदिल फरास यांच्यासह रविकिरण इंगवले, जयकुमार शिंदे, उदय पवार, नंदकुमार मोरे, दिगंबर फराकटे, नियाज खान, महेश उत्तुरे यांच्यासह शिवसैनिक, शहरातील तालीम मंडळे, तरुण मंडळांचे कार्यकत्रे उपोषणामध्ये सहभागी झाले.