नंदुरबार – लोकसभा निवडणुकीत आदिवासी कोळी जमतीकडून देखील उच्चशिक्षित उमेदवाराला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. सुशील अंतुर्लीकर हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
सन २००९ च्या निवडणुकीत देखील राजू कोळी या तरुण उमेदवाराला अपक्ष म्हणून लोकसभेत उतरविण्यात आले होते. तेव्हा नंदुरबार मतदार संघातील कोळी जमातीच्या लोकांनी जोरदार प्रचार करून कडवी झुंज दिली होती. नंदुरबार लोकसभेच्यादृष्टीने डॉ. सुशील अंतुर्लीकर यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी चर्चा आहे. भाजपातर्फे डॉक्टर खा.डॉ. हिना गावित व काँग्रेसतर्फे ज्येष्ठ आमदार के.सी.पाडवी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, या दोघांमध्ये सरळ लढत असली तरी डॉ, सुशील अंतुर्लीकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढतीचे चित्र निर्माण होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात आदिवासी कोळी जमातीची मतदार संख्या मोठी आहे. त्यामुळे डॉ. अंतुर्लीकरांच्या उमेदवारीमुळे निकालावर काय परीणाम होतो याकडे लक्ष लागले आहे.
Prev Post