पिंपरी-चिंचवड : आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप करणार्या डॉ. अनिल रॉय यांना ताबडतोब निलंबित करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीने मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. अनिल रॉय यांचे पद काढून डॉ. पवन साळवे यांना देण्याचा निर्णय घेतला.
पण डॉ. रॉय यांनी प्रशासन अधिकारी डॉ. महेश डोईफोडे यांना अर्ज केला. त्यात त्यांनी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा व राजकीय दबाब असल्याचा आरोप केला आहे. डॉ. रॉय हे सध्या महापालिकेचे अधिकारी असताना त्यांनी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर केला आहे. त्यामुळे त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. डॉ. अनिल रॉय यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. डॉ. अनिल रॉय यांना मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद दिले. त्यावेळीसुद्धा देवाण घेवाण झाल्याचे म्हणायचे का? त्यामुळे अशा अधिकार्याला ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.