डॉ. अभय वाघ यांची पटेल तंत्रनिकेतनला भेट

0

शिरपूर । येथील आर. सी. पटेल तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) ला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सदिच्छा भेट देवून पाहणी केली. संचालक डॉ. अभय वाघ हे नुकतेच शिरपूर एजुकेशन सोसायटीच्या एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेच्याकार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यादरम्यान त्यांनी तंत्रनिकेतनला भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी तंत्रनिकेतनच्या विविध विभागांना भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत मंडळाचे विभागीय सचिव प्रमोद वायसे व मोहन मानकर तसेच आर. सी. पटेल अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. बी.पाटील, आर. सी. पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एन. जी. हसवाणी, विविध कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, मान्यवर उपस्थित होते.

शिरपूर डॉ. अभय वाघ यांनाप्राचार्य एन. जी. हसवाणी यांनी तंत्रनिकेतनमधील विविध उपक्रमांची माहिती दिली.डॉ. अभय वाघ यांनी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या माहिती संकलन प्रणालीचे विशेष कौतुक केले. दरम्यान या भेटीअगोदर त्यांनी तंत्रनिकेत व फार्मसी मधील प्राध्यापकांशी सुसंवाद साधला. संस्थेची कार्यप्रणाली व गुणवत्ता, दर्जा, भव्य इमारती, अत्याधुनिक सोयी-सुविधा पाहून संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्याबद्दल डॉ.अभय वाणी यांनी गौरवोद्गार काढले.