पुणे:एशिया टुडे रिसर्च अँण्ड मिडिया आणि इंडिया टुडे टेलिव्हिजन पार्टनर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ‘ अॅडमायर प्रिन्सिपल ऑफ द ईयर, महाराष्ट्र’ या पुरस्काराने डॉ.अभिजित औटी यांना सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे शनिवारी औटी यांना हा पुरस्कार देण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मुरली मनोहर जोशी, अभिनेते गुलशन ग्रोवर व पद्मश्री बजरंग पुनिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ.औटी गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
पुरस्कार वितरण प्रसंगी ए.आर.मित्तल, ए.आय.सी.टी.ई. सेक्रेटरी डॉ.चौधरी, प्रशासकीय अधिकारी गौरव शर्मा आदी उपस्थित होते. हा पुरस्कार इंटरनशनल कोलबरेशन विथ फॉरेन युनिव्हर्सिटी त्याच बरोबर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील राज्य स्थरीय व राष्ट्रस्थरीय कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे डॉ.औटी यांचा सन्मान झाला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक रामभाऊ मोझे यांनी अभिनंदन केले.