डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी कोर्टाची पालिकेला नोटीस

0

मुंबई । बॉम्बे रुग्णालयातील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मंगळवारी दुपारी एल्फिन्स्टन परिसरात पाणी साचल्यामुळे अमरापूरकर कारमधून उतरले आणि चालत प्रभादेवीतील घराच्या दिशेने निघाले होते.

मात्र, यादरम्यान त्यांचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि त्यात ते वाहून गेले होते. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर यांना जीव गमवावा लागला अशी भावना व्यक्त होत होती. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकरांचा मृत्यू झाला असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. महापालिकेसह मुख्यमंत्री, राज्य सरकार, पोलीस आयुक्त, पर्जन्यजल निचरा विभाग यांनाही याप्रकरणी प्रतिवादी केले. प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.