जळगाव। येथील कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे रविवारी दुपारी 3.30 वाजता ला.ना.शाळेच्या गंधे सभागृहात डॉ.अविनाश सावजी (अमरावती) यांचे “चढा आरोग्याची पायरी, टाळा जंकफूड – फास्टफूडची न्याहरी” या विषयावर जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.अविनाश सावजी मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील आहेत. दहावी, बारावी, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी प्रथम श्रेणीत एमबीबीएसची पदवी संपादन केली आहे. 1984 ते 94 दहा वर्ष पूर्ण वेळ सामाजिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले आहे. 1994 मध्ये ‘प्रयास’ या समाजसेवी संस्थेची स्थापना त्यांनी केली. गेल्या 33 वर्षात 22 वर्ष आदिवासी व ग्रामीण भागात काम केले. फास्टफूड विद्यार्थी, युवकांच्या आवडीचा तर पालकांच्या काळजीचा विषय आहे. उपस्थितीचे आवाहन वैद्य जयंत जहागिरदार यांनी केले आहे.