डॉ. आंबेडकरांचा जीवनपट गायन, नृत्यातून उलगडणार

0

मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र दर्शन नृत्यातून, गायनातून, संवादातून होणार आहे. यात सुमेध मोरे हा डॉ. आंबेडकरांच्या तर सीमा पाटील ही रमाईबाईंच्या व्यक्तीरेखेत पाहायला मिळणार आहे. या कामासाठी सीमा पाटील यांना यापूर्वी मुंबई व पुणे महापौर पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे. ही महिला शाहीरा रमाबाईंच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवन संघर्षाचा आलेख पोवाड्याच्या माध्यमातून पंचवीस कलाकारांसह साकार करणार आहेत. रविवार 17 सप्टेंबर रात्री 8 वाजता परळच्या दामोदर हॉलमध्ये ‘वुई द पिपल’च्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची नोंद फक्त मराठी गाण्यातूनच घेतलेली नाही तर पंजाबी, भोजपुरी, हिंदी, गुजराती, तेलगू इतकेच काय तर जपानी भाषेतील गीतातूनही घेतलेली आहे.