डॉ. आंबेडकरांना व्यक्तीपुजा मान्य नव्हती – डॉ. पगारे 

0
राष्ट्रवादीचा संविधान सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी : एखादी व्यक्ती जन्मभर जरी तुमच्यासाठी लढली तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करु नये. राष्ट्रहित व लोकशाही हेच सर्वश्रेष्ठ आहे. कोणताही पक्ष, पक्ष व्यवस्था किंवा व्यक्ती राष्ट्रहितापेक्षा मोठी असू शकत नाही. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रासाठी घटना लिहीताना घटना समितीने तीचे संविधान कोणत्याही व्यक्तीला, देवाला, धर्माला अर्पण केले नाही तर मानवतेला अर्पण केले. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणतीही व्यक्तीपुजा मान्य नव्हती, असे मत डॉ. प्रशांत पगारे यांनी व्यक्त केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी संविधान सन्मान सोहळा व संविधान प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते भगवान वैराट यांना ‘झोपडपट्टी रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार अ‍ॅड.जयदेव गायकवाड, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, युवा नेते नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, माजी महापौर योगेश बहल, डॉ.वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर महंमद पानसरे, जगन्नाथ साबळे, विश्रांती पाडाळे, नगरसेविका गीता मंचरकर, शाम लांडे, माजी नगरसेविका शमीम पठाण, उत्तम हिरवे, गंगा धेंडे, विनोद कांबळे, अरुण बोर्‍हाडे, फझल शेख, वर्षा जगताप, सुनिल गव्हाणे, आनंदा यादव, पुष्पा शेळके, सविता खराडे, डॉ. अशोक शिलवंत, ज्ञानेश्‍वर कांबळे, रामदास मोरे आदी उपस्थित होते.
यांचाही केला सन्मान
यशदाचे संशोधन अधिकारी डॉ.बबन जोगदंड यांच्या मातोश्री गिरजाबाई पंडीतराव जोगदंड, डॉ.अशोक शिलवंत यांच्या मातोश्री कमल तुळशीराम शिलवंत, पोलिस निरीक्षक सिता वामन वाघमारे, काशीबाई दत्तात्रय गायकवाड आणि माजी समाज कल्याण आयुक्त आर.के.गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संजोग वाघेरे पाटील, सुत्रसंचालन शुभांगी शिंदे आणि आभार विनोद कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनात माजी नगरसेवक अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग महिला शहराध्यक्षा गंगाताई धेंडे, माजी नगरसेवक व झोपडपट्टी सेल शहराध्यक्ष उत्तम हिरवे यांनी सहभाग घेतला होता.