डॉ. आंबेडकर ग्रुपतर्फे नगरसेवक ओव्हाळांचा सत्कार

0

ओव्हाळ यांची राजीनाम्यामागील भूमिकेबद्दल

पिंपरी : दलितांवरील वाढलेल्या अत्याचार व प्रश्‍न न सुटल्याच्या मुद्यावर भाजपपासून अलिप्त राहण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने पिंपरीत हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश कदम, रयत विद्यार्थी विचार मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे, ब्लू पँथरचे सनी पवार, अतुल क्षिरसागर, ग्राहक हक्क समितीचे अमोल उबाळे, रविंद्र सावळे, अमित भालेराव, अंजना गायकवाड, अनिता सावळे आदी उपस्थित होते.

भीमा कोरेगाव दंगल, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि अनेक राज्यांमध्ये वाढलेल्या दलित अत्याचारांच्या घटनांमुळे आज देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपच्या पापाचे भागीदार व्हायचं नाही, अशी योग्य भुमिका घेऊन समाजासाठी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली. त्याची भूमिका योग असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.