जळगाव । महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 11 ते 14 एप्रिल दरम्यान विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 11 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये सातारा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डॉ.यशवंत चावरे यांचे ॠपाण्याच्या हक्कासाठी कायदेशीर लढाॠ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार, 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता प्रवीण ओहोळ व समूहाचा फुले-आंबेडकर गीतगायन कार्यक्रम होणार आहे. दि. 13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर होईल. 14 रोजी सकाळी 7.30 वाजता विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांनतर सकाळी 10.30 वाजता परिसंवादात प्रा.भिमराव भोसले (औरंगाबाद) व जयसिंग वाघ (जळगाव) हे वक्ते सहभागी होण्याचे आवाहन केले.