डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचे नेतृत्व महिलांकडे

0

शेंदुर्णी । येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे नेतृत्व यावर्षी सर्व महिला करणार असून 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून येथील सर्व बोद्ध समाज बांधवांनी उत्सव समितीचे नेतृत्व जिल्ह्यात प्रथमच महिलाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आज सर्व बोद्ध समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पध्दतीने उत्सव समिती निवडण्यात आली.

यांची झाली निवड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष पदी सिंदूबाई रतन निकम, उपाध्यक्षपदी नबाबाई लक्षण नन्नवरे, सचिवपदी आम्रपाली दीपक निकम ,सहसचिव श्‍वेता गौतम निकम, खजिनदार आशाबाई दिलीप भालेराव, सहखजिनदार सुमनबाई कौतिक निकम, सल्लागार वर्षा अविनाश निकम, हिराबाई बळीराम वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड सभेचे आयोजन रा. दे.निकम गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सभेत विलास वाघ, देविदास निकम, शरद भालेराव,सहदेव निकम, अविनाश निकम ,उत्तम घोडेस्वार, हरीश निकम,सुनील निकम, गुलाब बाविस्कर, चांद्रमनी निकम,विजय सपकाळे यांची व महिलांची उपस्थिती होती.