आमदार संजय सावकारेंच्या प्रयत्नांना यश
भुसावळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत भुसावळ तालुक्यात आठ कामांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरि व ग्रामिण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांमध्ये विकासात्मक मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाअंतर्गत सन २०१८ -१९ या वित्तीय वर्षासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. या योजनेतून भुसावळ तालुक्यातील काही महत्वाचे कामे आमदार संजय सावकारे यांनी सूचविली होती. या कामांसाठीही राज्य शासनाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मौजे कंडारी ता. भुसावळ येथील वॉर्ड क्रमांक पाच गोलाणी परिसरातील अनुसूचित जाती वस्तीतील दोन किलोमिटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे – ३० लाख रुपये, कपीलवस्ती ता. भुसावळ येथील रस्त्याचे व गटारीचे बांधकाम करणे, मौजे किन्ही ता. भुसावळ येथील नवनाथ मंदिरापासून ते इंदिरानगर अनूसूचित जाती वस्ती पोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कठोरा खुर्द भुसावळ येथील पोच रस्त्याचे व गटारीचे बांधकाम करणे, साकरी ता. भुसावळ येथील राजेंद्र रंघे यांच्या घराजवळील अनूसूचित जाती वस्तीत वॉर्ड क्रमांक २ व ५ मधील समाज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, साकेगाव येथील वॉर्ड क्रमांक सहा मध्ये रस्त्याचे व गटारीचे बांधकाम करणे, विल्हाळे येथील मागासवर्गीय वस्तीत पोच रस्ता ६०० मिटर रस्त्याचे खडभ्करण व डांबरीकरण करणे, यशवंत कॉलनी येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये रस्ते व गटारीचे बांधकाम करणे आदी कामांसाठी प्रत्येकी दहा लाख असे एकूण एक कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यातील गोरगरिब वस्त्यांमध्ये मुलभुत विकास होणार आहे.