मुंबई। इंदूमिल स्थळी तोडकाम सुरम असून तेथे काम करण्यास कोणत्याही प्राधिकरणाने मनाई केलेली नाही. स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व विभागांच्या परवानगी घेतल्या असून, महापालिकेचेही आवश्यक पत्र लवकरच मिळेल. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच आंबेडकर जयंतीपर्यंत इंदूमिल स्थळी प्रत्यक्ष स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास 14 एप्रिलपूर्वी प्रारंभ करावा त्यासाठी आवश्यक असणारे सर्व तांत्रिक अडचणी सोडवून आवश्यक परवानगी मिळवाव्यात, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. आठवले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात रिपाइंचे राजा सरवदे, काका खांबाळकर, एस. एस. यादव, एम. एस. नंदा, विठ्ठल पाटील, चंद्रशेखर कांबळे, भीमराव सवादकर, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.