डॉ. आचार्य विद्यालयात ऑनलाईन रक्षाबंधन

0

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात ऑनलाईन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधननिमित्त व्हिडीओच्या माध्यमातून राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. भावा-बहिणीच्या प्रेमाची महती ही श्रीकृष्ण द्रोपदीची गोष्ट मुलांना सांगण्यात आली. तसेच नारळी पौर्णिमेचे महत्त्वदेखील विशद करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख योगिता टेमकर व शिक्षकांचे सहकार्य लाभले.