डॉ. आबनावे यांना जीवनगौरव पुरस्कार

0

पुणे । बाबु जगजीवनराम राष्ट्रीय प्रतिष्ठान भारत सरकार यांच्या वतीने तेराव्या आंतराराष्ट्रीय, आंतरभाषीय विजय दिवस सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे डॉ. विकास आबनावे यांना माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. आबनावे यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील कार्य केले आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतम, लोकसभा सदस्य डॉ. टी मेइन्ना, भारत नेपाळ मैत्री संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश विश्‍वकर्मा, साहित्य अकादमीचे अध्यक्ष नेफसिंह खोवा उपस्थित होते. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जातीनिर्मूलन कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून स्वीकारला तर प्रगतीचे मार्ग खुले होतील, असे मीरा कुमार यांनी यावेळी सांगितले.

विविध पुरस्कारांचे वितरण
प्रसाद आबनावे, शीतल वैद्य, पुष्कर आबनावे, प्रेमलता आबनावे, कांचन आबनावे, आर. वाय. देशमुख, रुची कुलकर्णी या महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाशी संबंधित असणार्‍या व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच डॉ. जितेंद्र आर्या, डॉ. दीपक देशपांडे, सुमिता सातारकर या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुमार यांनी केले. प्रा. गोरख साठे यांनी आभार मानले.