डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून सत्कार

0

जळगाव । दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत निवडुन आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा दिल्ली प्रदेश निवडणुक अधिकारी तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमेटीचे निवडणुक अधिकारी माजी खासदार डॉ. पाटील हे दोन दिवसाच्या दिल्ली दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय मांकन यांची भेट घेऊन संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा केली. 21 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि प्रदेशअध्यक्ष यांच्या निवडणुकाही डॉ.उल्हास पाटील यांनी जाहीर केल्या आहे.यावेळी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत विजयी झालेले एनएसयुआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉकी तौसिद व उपाध्यक्ष कुणाल शेरावत यांचाही माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सत्कार केला. संघटनेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा सल्लाही डॉ. उल्हास पाटील यांनी दिल्ली विद्यापीठाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना दिला.