डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या कार्यशाळेत 130 डॉक्टरांचा सहभाग

0

भुसावळ- जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे भुसावळ येथे आयोजीत करंट अपडेट इन मेडीकल सायन्स या विषयावरील कार्यशाळेत 130 डॉक्टरांनी सहभाग घेतला. भुसावळातील आयएमए सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.उल्हास पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर हे उपस्थित होते. करंट अपडेट इन मेडीकल सायन्स या विषयावरील कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. महेश चौधरी यांनी केले. या कार्यशाळेत वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखांनी विविध विषयांवरील करंट अपडेटची माहिती दिली. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अपडेट विषयी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. जनरल प्रॅक्टीशनरसाठी आयोजीत या कार्यशाळेत 130 डॉक्टरांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार डॉ.महेश चौधरी यांनी मानले. प्रशासकिय अधिकारी भरत जैन यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.