डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात बायपासच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ३० वर्षीय तरूणाला मिळाले जीवदान

0

जळगाव: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात अवघ्या तीस वर्षाच्या तरूणावर बायपासची शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांच्या चमुमुळे यशस्वी ठरल्याने या तरूणाला जीवदानच मिळाले आहे. ऐन तारूण्यात हृदयविकाराचा त्रास ही सध्याच्या काळात गंभीर समस्या बनली आहे. दैनंदीन जीवनातील ताण-तणाव यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशाच एका तीस वर्षीय स्वप्नीलला गेल्या काही दिवसांपासुन छातीत दुखण्याचा त्रास होत होता. हा त्रास असह्य होऊ लागल्याने त्याच्या आईने त्याला तातडीने उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी हृदयविकार तज्ञ डॉ. रमेश मालकर यांनी त्याची एन्जीओग्राफी केली.

या तपासणीत त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या तीन धमन्यांमध्ये ब्लॉक असल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉ. मालकर यांनी स्वप्नील यास बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यावेळी स्वप्नील आणि त्याची आई चांगलेच हादरले. अवघ्या वयाच्या तीसाव्या वर्षी हृदयविकाराचा त्रास कसा काय? झाला याविषयी विचार करू लागले. मात्र तज्ञ डॉक्टरांनी स्वप्नील आणि त्याची आई या दोघांना आश्वस्त केले आणि बायपास शस्त्रक्रियेसाठी स्वप्नीलनेही तयारी दाखविली.

सुरवातीला रक्तचाचण्या केल्या असता त्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असल्याचे आढळुन आले. यावेळी बायपास शल्यचिकीत्सक डॉ. यतीन वाघ, डॉ. बालाजी दराडे, ज्ञानेश्वर कोळी, दिपीका वसावे व बायपास विभागाच्या स्टाफने स्वप्नीलवर उपचार सुरू केले. त्यानंतर स्वप्नीलच्या पुन्हा रक्तचाचण्या करण्यात आल्या. या तपासणीचा अहवाल हृदयरोग भूलतज्ञ डॉ. वर्षा कुळकर्णी यांना दाखविण्यात आल्यानंतर त्यांनी स्वप्नीलवर बायपास शस्त्रक्रिया करण्यास संमती दिली. त्यानंतर बायपास शल्यचिकीत्सक डॉ. यतीन वाघ, डॉ. बालाजी दराडे, डॉ. वर्षा कुळकर्णी, परफ्युजनिस्ट दुर्गा, संतोष व दिपीका वसावे, ज्ञानेश्वर कोळी यांनी स्वप्नीलवर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नीलवर तब्बल तीन तास बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर स्वप्नीलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यास हृदयालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आठ दिवसानंतर स्वप्नीलवर करण्यात आलेले यशस्वी ठरले. स्वप्नीलच्या आईने स्वप्नील हा माझ्यासाठी एकमेव आधार असल्याचे सांगत हृदयालयातील तज्ञ डॉक्टरांसह संपुर्ण चमूचे ऋण व्यक्त केले