डॉ. किनगे यांनी केली पहिली मेंदू अ‍ॅन्जीओप्लास्टी

0

जळगाव: आज पर्यत खान्देशातील हॉस्पीटलमध्ये ह्दया संबंधी विकाराचे अ‍ॅन्जीओप्लास्टी होत असल्याचे माहित होते. मात्र आता जळगाव शहरात मेंदू विकारासंबंधी देखील अ‍ॅन्जीओप्लास्टी शस्त्रक्रिया होणार आहे. अ‍ॅक्सॉन बे्रन हॉस्पीटलचे डॉ.निलेश किनगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खान्देशातील पहिली मेंदु विकाराची अ‍ॅन्जीओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. नांदुरा येथील संजय पाटील यांच्या मेंदुत गाठ झाल्याने त्यांना लखवा झाला होता. त्यांच्यावर त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. महाराष्ट्रातील पाच ठिकाणी ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यापैकी खान्देशातील जळगाव येथील अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पीटल एकमेव आहे.

पुणे मंबई साख्या शहरात जाण्याची गरज नाही
डॉ.निलेश किनगे हे खान्देश, मराठवाडा, विदर्भ परिसरातील रुग्णांना सेवा देणारे एकमेव प्रख्यात इन्टरवेन्शन व स्ट्रोक न्युरोलॉजीस्ट असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मेंदु संबंधी अ‍ॅन्जीओप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे येथे जावे लागत होते. आता जळगाव शहरात रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध झाली असल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. लखवा झाल्यानंतर 8 तासाच्या आत शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या तंत्रज्ञानामुळे 24 तासानंतरही ही शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. यावेळी डॉ.वैजयंती किनगे, डॉ.अश्‍विनकुमार काळुंखे उपस्थित होते.