जळगाव शहरातील शाहू नगरात असलेले डॉ. के.डी. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि औषध निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘ईपका’ लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी 9 ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, पॅरालेसिस, हृदयविकार, पोटाचे विकार, झटके येणे, धूम्रपान व प्रदूषणामुळे होणारी ऍलर्जी, वजन कमी व जास्त असणे, चक्कर व डोकेदुखी, लघवीची समस्या, निद्रा विकार अशा विकारांसंदर्भात तज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करतील. शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य तो सल्ला देखील दिला जाणार आहे.तसेच या शिबिराचा लाभ जुने रुग्ण सुद्घा घेऊ शकतात नावनोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी 0257-2235010/7410786748/9511630419 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच शिबिराच्या दिवशी सुद्धा नोदणी करू शकतात असे आवाहन , डॉ. लीना पाटील यांनी केले आहे