औरंगाबाद । बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी महाराष्ट्रातील औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ. बी. ए. चोपडे यांची नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत सोशल मीडियावर याबद्दल चर्वित चर्वण सुरु होते. विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे, औरंगाबादमध्येही डॉ. चोपडे काशी विद्यापीठात जात असल्याची चर्चा आहे.