डॉ. चौधरींच्या भाजपा प्रवेशाने सत्तेचे समीकरण बदलणार

0

शहादा शहरासह तालुक्याची भूमिका महत्त्वाची

नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक राजकीय दृष्ट्या चांगलीच गाजणार असुन मोर्चे बांधणी सुरु आहे. शहादा शहरात या निवडणुुकीचे पडघम सुरु आहेत. शहरात आता ग्रामपंचायत निवडणूकापेक्षा नंदुरबार नगरपालिका निवडणूक हाच विषय चर्चेचा आहे. राजकीय नेत्यांनी शहरातील आप आपल्या कार्यकत्यार्ंना सूचना दिल्या आहेत. काही नेत्यांनी शहादा शहराशी संपर्क साधला आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणूकीकडे मिनी विधानसभा निवडणुक म्हणून पाहिले जात आहे.

या निवडणूकीचा निकालावर २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेचा निवडणूकीत नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे भवितव्य ठरणार आहे. एवढे महत्व पुर्ण खांदेशात प्राप्त होणार आहे. या निवडणूकीत साम दाम दंड सारे प्रकार वापरले जाणार आहेत. काँग्रेस व भाजपात राजकीय अस्तित्वाची लढत ठरणार आहे. आ. शिरीष चौधरी यांचे बंधु डॉ चौधरी यानी भाजपात प्रवेश केल्याने आता सत्ता संघर्ष वाढणार आहे. खा. हिना गावीत व आमदार डॉ. गावीत यांना सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. तर आ. चंद्रकांत रघुवंशी हे ह्या वेळी सारा राजकीय अनुभव वापरुन डॉ गावीत यांना मोठा हादरा देण्याचा प्रयत्न करतील. शहादा शहरासह तालुक्याची भूमिका नंदुरबार नगरपालिकेचा निवडणूकीत जिल्ह्यात महत्वाची आहे. आ. रघुवंशी यांनी तालुक्याचे नेते सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्याशी भेट घेवुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. दीपक पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे त्यांच्या दांडगा संपर्क व नंदुरबार शहरातील त्यांच्या कार्यकर्त्यांवर व नातेवाईकांची संख्या महत्वपूर्ण ठरणार आहे. आ. शिरीष चौधरी, हिरालाल चौधरी यांचा नातेवाईकांची संख्या संख्या बघता शहादा शहरात संपर्क वाढविला आहे. समाजाचा कार्यकर्त्यांचा भेटीगाठीवर भर दिला आहे व कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे बंधु भाजपाकडुन नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने शहरातील समाज बांधव सक्रीय झाले आहेत.

निवडणूक काळात शहादा शहरातील शेकडो कार्यकर्ते नंदुरबारयेथे ठाण मांडुन बसण्याची शक्यता आहे.आ. चौधरी हे स्वतः शहादा शहरात नातेवाईक व कार्यकर्त्यांचा संपर्कात असल्याचे सांगितले. आ.चौधरी व विजय चौधरी यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तर खा. गावीत व आमदार गावीत यांनी दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व भाजपा कार्यकर्त्यांची बैठक शहरातील विकास कामाचा भूमीपूजना नंतर घेतली.