डॉ. चौधरींनी घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट

0

जळगाव। डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गुरूवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान भवनात भेट घेवून जळगाव शहरातील 6 रस्ते अवर्गीकृत करण्याच्या निर्णयावरील आक्षेप नोंदवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. हा निर्णय घेतांना आर्थिक व्यावहार झाल्याची डॉ. चौधरींनी व्यक्त केली.

तसेच सर्व कागद पत्रे सादर केले. यातच अधिकार कक्षाबाहेरचा हा निर्णय रद्द केला पाहीजे. आमदारांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर मंत्री पाटील यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांना दिले.