डॉ.जितेंद्र ठाकूर यांची अनोखी रुग्णसेवा

0

धुळे । जिल्हा सामान्य रूग्णालयात दररोज उपचारासाठी शिरपूर, शिंदखेडा, साक्री व जिल्ह्यातून अनेक गरजू रुग्ण येतात. मात्र अनेकांना तेथे काही माहिती नसल्याने काही लोक उपचार न करताच परत जातात. अनेकांना वेळेवर रक्ताची गरज असते तर यासह अनेक गोष्टींची मदत कुणीतरी करावी ही अशिक्षित गोर गरीबांची अपेक्षा असते. याचा विचार करून डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी स्वःखर्चाने आरोग्य सेवक नेमण्याचे ठरवले. आणि त्यानुसार देवेंद्र राजपूत, शिरपूर यांची नेमणूक केली. यामुळे आत्तापर्यंत अनेक रुग्णांना वेळेवर रक्त मिळवून देण्याचे काम देवेंद्रभाऊ हे डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने करतात.

गरजवंतासाठी रात्री अपरात्री यांची हजेरी
डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या या अनोख्या मदतीमुळे अनेकांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे, अपंग लोकांना त्यांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र साठी मदत करणे, डॉक्टरांसोबत रुग्णांची भेट घालून योग्य सल्ला घेणे, यांसह अनेक अपघातग्रस्थ रुग्णांना रात्री अपरात्री देखील मदत मिळत आहे. दोन महिलांना रक्ताची गरज असतांना त्यांना तात्काळ डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने रक्त उपलब्ध करुन दिले. भाजपाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष असलेले डॉ.जितेंद्र ठाकूर हे आपल्या श्री सिद्धेश्‍वर हॉस्पिटलमध्ये अनेकांना मदत तर करतातच मात्र या अशाप्रकारे सरकारी अथवा दुसर्‍या रुग्णांलयात देखील रुग्णांना मदत करतात. आत्तापर्यंत अनेक लोकांना डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्यामुळे मदत झालेली आहे.