लोहारा। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील डॉ.जे.जी. पंडीत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ.पंडीत विद्यालयत घेण्यात आलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेत यश मिळविले आहे. कु. पल्लवी संदीप चौधरी हिने इलेमेंटरी परीक्षेत ‘अ’ श्रेणी मिळवली तर नऊ विद्यार्थ्यांनी ‘ब’श्रेणीत यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे सचिव दिपक गरुड, वस्तीगृह सचिव देशमुख, स्थानिक समिती अध्यक्ष आबासाहेब शेळके, मुख्याध्यापिका सी.एस. डोळे , पर्यवेक्षक ए.एस.चौधरी यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना एस डी पाटील, पी.ए.सोनार शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.