पुणे विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने राबविला उपक्रम
आकुर्डी परिसरातील महाविद्यालयांनी घेतला सहभाग
आकुर्डीः सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित देहु व आळंदी ते पंढरपुर या मार्गावर येणार्या महाविदयालयांकडुन ‘स्वच्छ-स्वस्थ-निर्मल-निसर्गवारी’ या उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये देहू, आळंदी, पिंपरी-चिंचवड, पुणे आदी भागांमधील महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमामध्ये आकुर्डी परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी महाविदयालयाने सहभाग घेतला होता. आकुर्डी भागातील 5 महाविदयालयांचे प्रतिनिधीत्त्व करत या पाच महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा व विद्यार्थी विकास मंडळ विभागातील सहभागी विदयार्थ्यांच्या माध्यमातुन 600 विद्यार्थ्यांच्या मार्फत प्लॅस्टिकमुक्त रॅलीचे आयोजन महाविदयालयाकडुन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
या रॅलीत आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, प्रा. रामकृष्ण मोरे महाविदयालय, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविदयालय, निगडीतील अरविंद तेलंग महाविदयालय, आदी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. ही रॅली डॉ. डी. वाय. पाटील महाविदयालय ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत काढण्यात आली होती. या पर्यावरणपुरक प्लास्टिकमुक्त रॅलीबरोबरच या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पानाच्या पत्रावळयांचे वाटप, स्वच्छता, पथनाट्याच्या माध्यमातुन नागरिकांना जनजागृतीपर धडे दिले. प्लास्टिक वापर कसा घातक आहे, प्लास्टिकसाठी सर्वांनी नाही म्हणले पाहिजे, पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली पाहिजेत, पाणी जपून वापरले पाहिजे आदी गोष्टींबद्दल पथनाट्यातून मार्गदर्शन केले.
महाविद्यालयांनी केले प्रबोधन
पथनाटय तसेच वारकर्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. असे अनेक वेगवेगळ्या स्वरूपात वारींमध्ये काम केले. प्लास्टिकचा धोका युद्धापेक्षा मोठा, अशा घोषणा देत मोठया प्रमाणावर प्रबोधन करण्याचे काम या महाविदयालयांकडुन करण्यात आले होते. या प्रबोधन पर रॅलीत महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, डॉ. रामकृष्ण मोरे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर तसेच अरविंद तेलंग महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी सहभाग नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सम्नवयक डॉ. प्रभाकर देसाई सर तसेच प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा सम्नवयक डॉ. सविता कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग सम्नवयक डॉ. मिनल भोसले, प्रा. गणेश फुंदे, प्रा. खालीद शेख यांचा सहभाग होता.