हडपसरः महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे संस्थापक डॉ.सि.तु.तथा दादा गुजर यांना बाराव्या स्मृतिदिनानिमित्त सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयामधे आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे सचिव अनिल गुजर, उपाध्यक्ष सतिश आगरवाल व सामाजिक कार्यकर्ते तात्या जगताप यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येवून स्व.दादांच्या पूर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निलाक्षी प्रधान, उपप्राचार्य डॉ.निलेश फुले पदव्युत्तर समन्वयक डॉ.विद्या उंडाळे, रिसर्च समन्वयक डॉ.प्रणिता जोशी-देशमुख, माजी प्राचार्य डॉ.मुकुंद एरंडे, माजी प्राचार्या डॉ.वृंदा काकनूरकर, डॉ.कल्पना साठे, मुख्याध्यापक सुरेश गुजर, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या सुचिता ढेकणे यांचेसह अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन भालचंद्र देशपांडे यांनी केले.