डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील दोन आरोपींना जामीन !

0

पुणे-डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात हत्यार बाळगल्या प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या औरंगाबादच्या अजिंक्य आणि शुभम सुरळे या दोन्ही भावांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजुर करण्यात आला.

सध्या सुरळे बंधू न्यायालयीन कोठडीत आहे. दर सोमवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात हजरी, इतर साक्षीदारांवर दबाव न आणणे अशा अटींवर त्यांना जामिन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाशी सुरळे बंधूचा संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची लेखी माहिती खंडपीठाला सीबीआयने दिली. या प्रकरणात गेल्या २२ ऑगस्ट रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात शुभम आणि अजिंक्य सुरळेवर गुन्हा दाखल झाला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार अटकेत असलेला सचिन अणदूरे याने त्याचे मेव्हणे अजिंक्य आणि शुभम यांना पिस्तूल लपवून ठेवण्यास सांगितले होते. या आरोपाचे खंडन करत सुरळे कुटुंबांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यामुळै या निर्णयाविरोधात सुरळे यांनी खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली होती.