बेटावद । बेटावद येथे मुख्य रस्त्यावर उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचा लोकापर्ण सोहळा सोमवार 12 जून रोजी उत्साहात पार पडला. येथील प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले. सदरील प्रवेशद्वाराचे लोकार्पण रोहयो व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल उपस्थितीत झाला. उद्घाटन शिंदखेड्याचे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याहस्ते झाला. यावेळी सरपंच अरूण देशमुख, उपसरपंच रहिम खाटीक, ग्रामसेवक आनंदा पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, पं.स.सदस्या संजिवनी सिसोटे, अनिल वानखेडे, बीडीओ, मंडळाधिकारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.
धर्माधिकारी प्रतिष्ठानेचे अविरत उपक्रम
डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य अविरतपणे सुरू असून त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनातून सामाजिक, बौद्धिक व आर्थिक क्रांती शक्य असून प्रतिष्ठानाच्या कार्य सर्वांसाठी आदर्शदायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. प्रवेश द्वाराची उभारणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने झाली आहे. प्रतिष्ठानाच्या वतीने स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, जलाशय स्वच्छता, कुरण व्यवस्थापन, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्य वाटप, मुक-बधीर विद्यार्थ्यांसाठील मोफत श्रवणयंत्र वाटप यांसह आश्रयास्थानांची उभारणी, पाणपोई आदी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.