डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज निर्माल्य संकलन !

0

निर्माल्यापासून होणार खत निर्मिती प्रकल्प

भुसावळ- भुसावळ व यावल तालुक्यातील गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे .23 रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या एकत्रित केलेल्या निर्माल्या पासून खत निर्मिती करून प्रतिष्ठांने केलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमामार्फत लावलेल्या झाडांना वापरण्यात येणार आहे. भुसावळ शहरातील तापी नदीवर निर्माल्य संकलन केंद्र असणार आहे. घराघरात स्थापन केलेल्या गणेश भक्तांनी तसेच लहान मंडळांनी या संकलन केंद्राकडे व मोठ्या मंडळांकडे निर्माल्य जमा करावेत जेणेकरून त्याचे पावित्र्य राखले जाईल. मोठ्या मंडळांकडे जमा केलेले निर्माल्य प्रतिष्ठानचे सदस्य त्यांचेकडून जमा करणार आहे.