डॉ. पंडीत विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

0

जळगाव । येथील डॉ. पंडीत माध्यमिक विद्यालयातील आठ विद्यार्थी एन.एम.एम.एस. या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले.

यामध्ये ममता चौधरी, रिया पालीवाल, सपना पवार, दिव्या देशमुख, सपना परदेशी, प्रतिक्षा देशमुख, शुभम पाटील, मयुर क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .त्यांच्या या यशाबददल संस्थेचे चेअरमन .दादा साहेब संजयजी गरुड. संस्थेचे सचिव भाऊ साहेब दिपक गरुड .वस्तीगृह सचिव दादा साहेब देशमुख .संपर्क आधिकारी पटेल दादा .स्थानिक समिती अध्यक्ष आबासाहेब शेळके, मुख्याध्यापिका सी.एस. डोळे, पर्यवेक्षक ए.एस. चौधरी, लोहारा शहर पत्रकार मंच व गावातील पालकांनी कौतुक केले.