लोहारा । येथील डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.बी.इंगळे होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी.एस. डोळे पर्यवेक्षक ए.एस.चौधरी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन माल्यार्पण करण्यात आले.
प्रास्ताविक आर.एस. परदेशी यांनी केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या बालपण सामाजिक राजकीय जीवनावर मोठया संख्येने विचार मांडले शिक्षकांमधून आर.के. सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून श्री. इंगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विचार मांडले सुत्रसंचलन व्ही.एम.शिरपूरे यांनी केले आभार वाय.पी.वानखेडे यांनी मानले. यशस्वितेसाठी पी.एम. सुर्वे, शेळके मॅडम, डी.एम. गरुड, आर.जी.बैरागी, वाय.व्ही. चौधरी, एस.के. पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.