डॉ. पाटील आत्महत्त्याप्रकरणी तिघांचे जामीन फेटाळले

0

जळगाव । सासरच्या मंडळींच्या शारिरीक, मानसिक छळाला कंटाळून कठोरा येथे डॉ. स्वाती अभिजीत पाटील या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यातील तिघेही संशयित कारागृहात असून त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी कामकाज होवून न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. डॉ. स्वाती पाटील या विवाहिने 25 जुलै रोजी आत्महत्या केली होती.

आत्महत्त्यापूर्वी स्वाती पाटील यांनी लिहिलेली 11 पानी सुनासाईड नोट तालुका पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी सुनिल नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अभिजीत गोपाळ पाटील, गोपाळ इसन पाटील, मिराबाई गोपाळ पाटील या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तिघेही संशयित हे कारागृहात आहेत. जामीन मिळावा यासाठी तिघांनी न्या. सविता बारणे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर आज बुधवारी कामकाज होवून न्या. बारणे यांनी तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.