जळगाव । नशिराबाद जवळील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसरातून भुसावळ येथील हरीष बगाळे यांची दुचाकी व डिक्कीतला मोबाईल चोरी केल्याची घटना 27 मार्च 2017 ला घडली होती.
या प्रकरणी बगाळे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घटनेत यापूर्वी गणेश परदेशी रा. जंगीपुरा (ता. जामनेर) याला पोलिसांनी अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेतील दुसरा संशयित आरोपी शांताराम सुरवाडे रा. पुनगाव (ता.पाचोरा) याला नशिराबाद पोलिसांनी गुरुवारी अटक केली. न्यायाधीश जी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 10 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.