डॉ.पाटील रुग्णालयातील मोफत शस्त्रक्रिया अभियानास मुदतवाढ

0

जळगाव। येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व गोदावरी रुग्णालयातर्फे गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आल आहे. पाचशे शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट रुग्णालयाने ठेवले असून मोफत शस्त्रक्रिया अभियानास 3 एप्रिल पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे.

रुग्णालयातर्फे आयोजित या अभियानात नाक, कान, घसा, गर्भपिशवी, लहान बालकांवरील शस्त्रक्रिया, हार्निया, अपेन्डीक्स, प्रोस्टेट्र, मुतखडा, पोटाच्या शस्त्रक्रिया, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासंह इतर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. रुग्णांवर दुर्बिणीच्या सहाय्याने रुगणांना कमी वेदना होते त्यामुळे सर्व शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीच्या सहाय्याने केल्या जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे करण्यात आले.