जळगाव । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे महिला रूग्णांसाठी गर्भाशयाच्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येत आहे. हे शिबीर महिला रूग्णांसाठी संजीवनी ठरत असून त्यातंर्गत आत्तापर्यंत 68 महिला रूग्णांना या शिबीराचा लाभ झाला आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे सुरू असलेल्या औषधीसह मोफत शस्त्रक्रिया अभियानाला रूग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रूग्णांच्या आग्रहास्तव या अभियानाला 30 एप्रीलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानात महिला रूग्णांसाठीही विशेष शिबीर घेण्यात येत आहे. स्त्रीयांच्या समस्या, अडचणी यावर या शिबीरात मार्गदर्शन केले जात आहे. गर्भाशयाचे सर्व प्रकारचे आजार गर्भाशयावरील सुज, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयातील गाठी, गर्भपिशवी खाली सरकणे, वंध्यत्व निवारण, कुटूंबनियोजन यासारख्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. 30 एप्रिलपर्यंत गरजू महिला रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.