डॉ. पाटील रूग्णालयात 37 रूग्णांवर शस्त्रक्रिया

0

जळगाव । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत 37 रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात विविध विभागांतर्गत गरजू रूग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहे. थोड्याशा पैशांअभावी काही रूग्ण उपचाराबाबत टाळाटाळ करीत असतात. परीणामी भविष्यात त्यांचे आजार हे जीवघेणे ठरू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत अशा गरजू रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात कानाचा पडदा बदलविणे, कानाच्या पडद्याला असलेले छिद्र बुजवणे, घशामधील गाठी, नाकाचे वाढलेले हाड काढणे, नाकातील कोंब काढणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया या विभागांतर्गत केल्या जात आहेत. आत्तापर्यंत या विभागांतर्गत 37 रूग्णांवर नाक-कान-घसा संबंधीत शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.