जळगाव । डॉ. गंगाधर पानतावणे यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अत्युच्च आहे . विचारवंत, शिक्षक, कार्यकर्ता या भूमिका अत्यंत जबाबदारीने निभावणारे डॉ. पानतावणे यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे असे मत डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवार 27 रोजी पहाटे 2 वाजता दु:खद निधन झाले त्याबद्दल मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी प्रा.संजय हिंगोणेकर यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांची एक कविता सादर केली. प्रा. देवेंद्र इंगळे यांनी डॉ. पानतावणे हे आमच्यासाठी वैचारिक विद्यापीठ होते. त्यांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकता आल्या. नागसेनवनात त्यांनी लाखो विद्यार्थी घडवले. जगभरात दलित साहित्याची चळवळ नेण्याचे काम त्यांनी केले अशा भावना व्यक्त केल्या. मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी डॉ. पानतावणे यांच्या वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी कला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे, डॉ. चंद्रमणी लभाणे, डॉ. चारुता गोखले, डॉ. लक्ष्मण वाघ, डॉ. भूपेंद्र केसुर, डॉ. भाग्यश्री भलवतकर, प्रा. मनोज महाजन, प्रा. राजीव पवार, प्रा. विजय लोहार, प्रा. रजनी बोंडे, प्रा. दीनानाथ पाठक, प्रा. एन.एस.बोरसे, प्रा. रोशनी पवार, प्रा. अनिल क्षीरसागर, प्रा. हर्षल पाटील, डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. दिलवरसिंग वसावे, प्रा. योगेश बोरसे, प्रा. योगिनी राजपूत, डॉ. सविता नंदनवार तसेच कला विद्याशाखेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी केले.