डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषी डॉक्टरांना पोलीस कोठडी

0

मुंबई: येथील नायर हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. पायल तडवी यांनी रॅगिंग ला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने ३१ में पर्यंत कोठडी सुनावली आहे. आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवार, डॉ. भक्ती मेहेर यांना अटक केली आहे.

या तिघींना विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाचे अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर.एम.सदरानी यांनी आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी सुनावली.पायलने लिहून ठेवलेली चिट्ठी हा महत्वाचा पुरावा असून आरोपींनी नष्ट केल्याचा संशय आहे असे सांगितले. त्या बाबत त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी पोलिसांनी मागणी केली होती.

पायल तडवीने नायर हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सततच्या होणाऱ्या वरिष्ठ सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यावरून आरोपी डॉक्टरांवर अॅट्रॉसिटीविरोधी कायदा, रॅगिंगविरोधी कायदा असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी महिला डॉक्टर फरार झाल्या होत्या त्यांना पोलिसांनी सहा दिवसांनी अटक केली आहे.