पुणे : मुंबईतील नायर रुग्णालयातील तरुण निवासी डॉ.पायल तडवी याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायामध्ये सामाजिक व श्रेणीय पैलू निर्माण करण्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना करण्यत आली आहे. या समितीत डॉ. अशोक आढाव (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर), डॉ. रवी वानखेडेकर (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, धुळे), डॉ. चंद्रकांत म्हस्के, (डीन जीएमसी नांदेड), डॉ. होझी कपाडिया, (आयएमए प्रदेशाध्यक्ष, मुंबई) डॉ. सुहास पिंगळे, (आयएमए राज्य सचिव) या सदस्यांचा समावेश आहे.
डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थिती काम करावे लागते ती स्थिती व विशेषत: सरकारी रुग्णालयांतील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार आहे आणि एका आठवड्यामध्ये समितीने आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. अभ्यासाच्या अहवालाच्या अनुषंगाने, सद्यस्थितीच्या संदर्भात योग्य उपाय राबवले जातील असे आयएमए तर्फे सांगण्यात आले आहे.