भुसावळ-सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन समाजातील दुर्बल घाटकांच्या उन्नतीसाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेऊन डॉ.प्रमोद भानुदास नारखेडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पद्मश्री मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरळी कांचनचे अध्यक्ष डॉ.अशोक पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.प्रमोद नारखेडे हे हृदयरोग तज्ञ असून अन्जिओग्राफ़ी, अन्जिओप्लास्टी व पेसमेकर डिवाईस सारख्या विविध गुंतागुंतीची हृद्य विकारासंबंधी शस्त्रक्रिया त्यांनी केली आहे. पुण्यातील एम.एम.वार्ड इन्स्टीट्युट ऑफ कार्डीऑलोंजी, जहांगीर हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल या सारख्या मल्टीस्पेशोलिस्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा बजाविली आहे.
डॉ.नारखेडे हे वाडिया महाविद्यालय पुणे येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.शांताराम बोंडे, शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथील प्रा.दिलीप बोंडे, सेवानिवृत्त पोलीस हवालदार अरुण बोंडे यांचे जावई तसेच जळगाव येथील स्वतंत्र सैनिक बळीराम तुकाराम नेमाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मा.सचिव लक्ष्मण बोंडे यांचे ते नातजावई आहेत.