पाचोरा- बाँल्सब्रिज विद्यापीठ, डोमिनीकाशी संलग्न असलेले यांच्यातर्फे दिला जाणारा ‘प्रेस्टिजियस बेस्ट रिसर्च फेलो २०१९’ हा संशोधन क्षेत्रात अतुल्य योगदानासाठीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. या संदर्भात ई-मेल प्राप्त झाले आहे. ही सामाजिक संस्था महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देत असते. संशोधन क्शेत्रात मोठ्या योगदानाबद्दल पुरस्कार जाहिर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ६ जानेवारी २०१९ रोजी संध्या ५ वाजता हॉटेल बिग सिटी ॲड. बॅक्वेट, बॉस्को नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे आरोग्यमंत्री शोभाताई बच्छाव यांच्याहस्ते होणार असून यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश पवार, डॉ. दिनेश बच्छाव, उमविचे क्रिडा संचालक दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. प्रियंका पाटील यांचे अभिनंदन केले.