जळगाव: हैद्राबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियंका रेड्डीवर पाशवी बलात्कार करून निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. देशभरात मोर्चे निघत आहे. दरम्यान आज बुधवारी जळगाव शहरात देखील डॉक्टरांनी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
घटनेचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.