पहूर : येथे विविध शाळा, कनिष्ट महाविदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला . लेले नगर जि.प. मराठी शाळेत प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. मुख्याध्यापक अनिल घाटे अध्यक्षस्थानी होते. आर.टी.लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक सी .टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. संतोष भडांगे यांनी सुत्रसंचालन केले. आर .बी.आर. कन्या विद्यालयात सुधिर महाजन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हेडगेवार प्राथ.विद्यालयात मुख्याध्यापक यूनूस तडवी, शिक्षकवृंदाने प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सावित्रीबाई फुले विदयालयात दिपाली पाटील इयत्ता 10 च्या विद्यार्थीनीस अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर भामेरे यांनी मार्गदर्शन केले. अपेक्षा पाटील, स्वाती देशमुख, पायल पाटील, नेहा देशमुख, भरत चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. चंदेश सागर यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
भातखंडे विद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा
भातखंडे । येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला या वेळी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक जी. जे पाटील यांनी प्रतिमा पूजन केले या प्रसंगी शाळेतील शिक्षक एस एन सोनवणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश बाबत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली यावेली शिक्षक आय. जे. पाटील, एन. यू. देसले, बी एन. पाटील, एस. बी. भोसले, एस.एन. सोनवणे, एस.जे. सैदाणे, एस.बी. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी नित्यानंद पाटील, संजय पाटील, सोपान पाटील, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एन.पाटील यांनी केले.