मुरूड जंजिरा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तरीही जिद्दीने उभे राहून आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. असे प्रतिप्रादन मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयात साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले. माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे, असे म्हणता येणार नाही. माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे तुमच्या मताची किंमत मीठ- मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणार्यांइतके कंगाल कोणीच नसेल. जो प्रतिकूल मतांना घाबरून जात नाही, दुसर्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा, जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे, हे शिकवेल.
स्वातंत्र्य भारतानंतर त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे वृत्तपत्र काढले
सुरेश पवार यांनी उपस्थितीत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यासमोर मनोगत व्यक्त केले. बाबासाहेबांनी जी पत्रे काढली त्यात ‘मूकनायक’ या 1920 साली निघालेल्या पत्राचा समावेश आहे. दलितात जागृती करणारे, समाजाला शिक्षित करण्याची प्रेरणा देणारे ते बहुधा भारतातील पहिलेच पत्र असावे. यानंतर डॉ. बाबासाहेबांनी 1927 मध्ये ‘बहिष्कृत भारत’, 1930 मध्ये जनता आणि 1956 मध्ये ‘प्रबुद्ध भारत’ ही पत्रे काढली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे वृत्तपत्र काढले. त्यांचे हे वृत्तपत्र किंवा ब्राह्मणेतर विचारांची वृत्तपत्रे काय यांच्या लेखनातून सामाजिक आणि सांस्कृतिक निकड सर्वांनाच जाणवू लागली. फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरलेली विषमता, विशिष्ट समाजाच्या अंगी बाणला गेलेला सांस्कृतिक अहंकार आणि स्वत:चीच अहंभावना बाळगणार्या नेतृत्वात आढळणारा विसंवाद, पोखरलेपण, अर्थहीनता विशद करून एक नवा समाज घडवण्याची त्यामागे प्रेरणा असली, तरी त्यातून काही प्रमाणात ब्राह्मणद्वेषही व्यक्त होत होता.