नवापुर। येथील मनुभाई सी दिवाण अध्यापक विदयालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुष्पवन महिला बहुद्देशिय संस्था काळंबा यांच्या संयुक्त विदयमाने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानमाला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत शेटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबाफुले यांचा प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलन करुन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पुनम बिहाडे, वैशाली बिराडे, प्रा एस.के. त्रिभुवन, प्रा आर बी.बागड, वी. एस.पाटील, शमा देशपांडे, आर. डी. साळवी, अनिल गावीत हे होते.
यशस्वीतांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, पुस्तक
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमारी वैशाली बिराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात व्याख्यानमालेत विद्यार्य्थीनी सहभाग घेतला होता. यात प्रथम क्रमाक कुमारी रवीना गायकवाड व रोशन वसावे तर दुसरा क्रमाक निशा गावीत व मनिषा गावीत तर तीसरा क्रमांक अजय मंजुळकर व सोनी सोनवणे यांना ट्रॉफी, पुस्तक, प्रमाणपत्र उपस्थित मान्यवराचा हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.वी.एस.पाटील यांनी केले.
व्यक्तिमत्वाचे उलगडले पैलु
पाण्यासाठी पहिले सत्याग्रह करणारे बाबासाहेब पहिले व्यक्ती आहे. या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकात शेटे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबाफुले फुले या दोन व्यक्ती भारतात काय जगात सपाडणार नाही. डॉ बाबासाहेब यांना 9 भाषा येत होत्या. ते थोर राजकारणी होते. बाबासाहेब हे 24 तास आभ्यास करीत होते. ज्ञानाची गंगा त्यांचा जवळ होती त्यांचे विचार व आचार आचारण्यात आले पाहीजे स्त्री शिक्षणाचे काम महात्मा ज्योतीबाफुले यांनी केले आहे.
डॉ. आंबेडकरांनी सर्वांचा विचार केला
यावेळी उपस्थित मान्यवराचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा.त्रिभुवन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विषयी व्याख्यान करतांना सांगितले की बाबासाहेबांचे जीवन प्रवास सामाजीक संघर्षचे पैलु होते बाबासाहेब आंबडेकर उत्कृष्ट धर्मपंडित होते त्यांनी केवळ ज्ञानाच्या बळावर जगावर व मनावर राज्य केले. असा व्यक्ती ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले त्यांनी फक्त दलितांचा विचार केला नाही तर सर्वासाठी विचार केला. त्यांनी आधुनिक भारत कसा असावा या विषयी अधिक माहिती दिली.