महाड : गजल उसने छेडी मुझे साज देना जरा उमरे रफता को आवाज देना, किसीको अपने आलम का हिसाब क्या देते सवाल सारे गलत थे जवाब क्या देते, अशा बहारदार गझलांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गझल वाचनाचा कार्यक्रम रंगला. महाविद्यालयात उर्दु विभागातर्फे ङ्गङ्घमहफिल -ए – गजलफफ या कार्यक्रमाचे 25 जुलैला आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मराठी गझल प्रांतातील सुप्रसिध्द गझलकार व शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटिरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथील डॉ. प्रकाश धुमाळ हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या गझल वाचनाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनाजी गुरव होते. डॉ. प्रकाश धुमाळ यांनी संवेदनशील माणसाच्या आयुष्यामध्ये गझलेला अनन्य साधारण महत्त्व असते. माणसाच्या जगण्यातील सुख दुःखाचे नेमक्या शब्दात वर्णन करण्याचे सामर्थ्य गझलेत असल्याचे सांगितले. प्राचार्य धनाजी गुरव यांनी उर्दु भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. उर्दु भाषा शिकण्यासाठी गझल, शेर शायरी, उर्दु गाणी या माध्यमाचा उपयोग करता येतो असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तझीन नाटुस्कर या हिने केले केले.